| महानायक वृत्तपत्राचे संपादक सुनील खोब्रागडे यांनी अशोक जाधव यांच्यां नेतृत्वात स्थापन झालेला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पळविला.
महानायक वृत्तपत्रांचे सर्वेसर्वा सुनील खोब्रागडेजी यांनी १४ एप्रिल २००९ ला नाशिक रोड येथे माननीय अशोक जाधव यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या "स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे" नाव चोरून, संसारे व अंधारे यांना हाताशी पकडून, भावनात्मक रीत्या बाबासाहेबांच्या अस्थि दाखवून, त्याच नावाने पुन्हा आपला एक नवीन गट निर्माण करून बाबासाहेबांच्या अनुयायांचे काँग्रेसच्या इशाऱ्यावरून मत विभाजन करण्याचे षडयंत्र रचले आहे. तेव्हा बाबासाहेबांच्या अनुयायांनी अशा संधीसाधू लोकांपासून सावध राहून बहुजन समाज पक्षाच्या हत्ती चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने आपले प्रतिनिधि विधानसभेत व लोकसभेत पाठवून पुन्हा महाराष्ट्रात बौद्धांचे राज्य आणण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करावा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून नाशिकरोड येथे १४ एप्रिल २००९ ला एक नव्या गटाची "स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष" म्हणून स्थापना झाली होती.. त्यावेळी माननीय अशोक जाधवजी म्हणाले होते, लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम देशात सर्वत्र वाजत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसह अनेक प्रादेशिक पक्ष आपापल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व धार्मिक अपेक्षा मतदारांच्या गळी उतरवण्याचा आटापिटा करीत आहेत. डॉ. आंबेडकरांचे नाव घेऊन अनेक नेते इतर पक्षांसोबत सहकार्य करीत आहे. पण, त्यात एकही खरा आंबेडकरवादी गट नाही तर स्वयंघोषित गटनेते इतर राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून घेत आहे, अशी तक्रार स्वा.रिप.पक्षाची स्थापना करताना व्यक्त करण्यात आली. गटातटांमुळे रिपब्लिकन नेतृत्वात समन्वयाचा मोठा अभाव निर्माण झाला. त्याचा लाभ इतर पक्षांच्या राजकीय धुरिणांनी उठवला. स्वयंघोषित नेत्यांच्या कार्यपद्धतीमुळे रिपब्लिकन समाज दिशाहीन झाला आहे. छुपा जातीयवाद खेळणाऱ्या पक्षांनी या नेत्यांना हाताशी धरून सत्तेची अमिषे दाखविली. त्याद्वारे एकसंघ रिपब्लिकन शक्ती निर्माण होणार नाही याची काळजी पक्षांनी घेतली. या जातीयवादी घटनांचे प्रतिबिंब प्रचार यंत्रणेवर पडणार नाही याची हे जातीयवादी पक्ष डोळ्यात तेल घालून घेत आहेत, असे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी एका निवेदनात म्हटले होते.. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून रिपब्लिकन पक्ष राजकिय, सामाजिक, आर्थिक पटलावर कार्यान्वित व्हावा अशी डॉ. आंबेडकरांची तळमळ होती. परंतु काही रिपब्लिकन नेत्यांनी मनुवादी राजकीय पक्षांशी हात मिळवणी करून अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे रिपब्लिकन जनतेचा या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. रिपब्लिकन जनतेला पुन्हा स्वाभि मानाची दिशा दाखवण्यासाठी व स्वतच्या पायावर उभे करण्यासाठी चळवळीतील स्वाभिमान या तत्वावर एकसंघ करण्याच्या उद्देशाने 'स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची'ची स्थापना करण्यात आली आहे. जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी करणाऱ्या नेत्यां शिवाय स्वाभिमान ऐक्य निर्माण होऊ शकते. रिपब्लिकन जनतेचे डॉ. आंबेडकर हे सर्वकाळ नेते राहतील ही विचारधारा नव्याने निर्माण होण्याची गरज आहे, असे पत्रकात नमूद केले आहे. अशा स्वाभिमानी आंबेडकरी जनतेला एकसंघ करण्यासाठी 'स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष' कार्यान्वीत झाला आहे. हे मिशन पध्दतीचे काम असल्याने स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने त्यात सहभागी व्हावे असे आवाहन अशोक जाधव यांनी केले होते.. जयभीम.. नमो बुद्धाय.. |
No comments:
Post a Comment