Palah Biswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity No2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Zia clarifies his timing of declaration of independence

what mujib said

Jyothi Basu Is Dead

Unflinching Left firm on nuke deal

Jyoti Basu's Address on the Lok Sabha Elections 2009

Basu expresses shock over poll debacle

Jyoti Basu: The Pragmatist

Dr.BR Ambedkar

Memories of Another day

Memories of Another day
While my Parents Pulin Babu and basanti Devi were living

"The Day India Burned"--A Documentary On Partition Part-1/9

Partition

Partition of India - refugees displaced by the partition

Sunday, March 18, 2012

चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12307355.cms

चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक
18 Mar 2012, 0000 hrs IST  

फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी पक्की नाळ जुळलेली पल्लवी गेलं दशकभर भटक्याविमुक्तांच्या चळवळीसाठी पूर्णवेळ आणि विना मानधन झटत आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्था परिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद निर्मुलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे... सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पल्लवी रेणकेबद्दल सांगत आहेत तिचे वडील, भटक्या-विमुक्तांचे नेते बाळकृष्ण रेणके. 

सामाजिक चळवळीत झोकून देऊन आयुष्यभर काम केलेल्या माझ्या पिढीच्या कार्यर्कत्यांची एक समान व्यथा आहे. त्यांच्या पुढच्या पिढीला या चळवळींचं किंवा कामांचं आकर्षण वाटत नाही. उलट बऱ्याचदा त्याची नफरतच वाटते. त्यामुळे निवृत्तीच्या वयात अनेकजण उद्विग्न आणि अगतिक असतात. मी मात्र आज याबाबतीत अतिशय समाधानी आहे. आमचा भटका-विमुक्त समाज हा देशातला सर्वात तळागाळातला समाज आहे. वंचित, साधनविहीन आणि दुबळ्या भटक्याविमुक्तांना ६५ वर्षांनंतरही स्वातंत्र्याचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. मुंबईच्या फूटपाथवर राहून ४० वर्षांपूवीर् मी भटक्याविमुक्तांना संघटित करायला सुरुवात केली. संघर्ष, संघटन आणि शिक्षण यातून चळवळीला आकार येत गेला. २००६साली राष्ट्रीय भटके-विमुक्त आयोगाच्या अध्यक्षपदावर कंेद सरकारने माझी नियुक्ती केली. आयोगाच्या कामासाठी मला दिल्लीला स्थलांतरित व्हावं लागलं. सोलापुरला मी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कामाचं काय होणार, याची चिंता मला सतावत होती. अशावेळी माझी धाकटी लेक अॅड. पल्लवी मुंबई सोडून सोलापूरला धावली. माझ्या पाच मुलींपैकी मोठ्या चौघीजणी चारचौघींप्रमाणे आपलं करियर आणि घर-संसारात रमलेल्या आहेत. पल्लवी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. निरंजना शेट्टी, अॅड. संघराज रुपवते आणि कोलिन गोन्साल्विस यांच्या सोबत प्रॅक्टिस करीत होती. तिथे स्ट्रगल असला तरी आथिर्क स्थैर्य, प्रतिष्ठा, मानमरातब आणि सुखासीनता पुरेपूर होती. हे सारं झुगारून पल्लवीने सोलापूरला येऊन भटक्या-विमुक्तांच्या चळवळीला वाहून घेणं ही खरंच अवघड गोष्ट होती. पण गेल्या दशकभराच्या चळवळीतल्या स्वत:च्या योगदानाच्या बळावर ती आज 'लोकधारा'ची प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय समन्वयक बनली असून नुक्तीच तिची 'महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा'वर नियुक्ती झाली आहे. तिची ही ठसठशीत सामाजिकमुदा घडत असलेली बघणं, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. 

आज देशात भटक्या-विमुक्तांची लोकसंख्या १५ कोटींच्यावर आहे. त्यातले ९८ टक्के भूमिहीन आणि बेघर आहेत. ९५ टक्के लोक दारिद्यरेषेखालचं जीवन जगत आहेत. ७४ टक्क्यांना पात्र असूनही कागदोपत्री पुराव्यांअभावी बी.पी.एल. कार्डं मिळालेली नाहीत. अशा या दरिदी, निराधार आणि परिस्थितीशरण लोकांना मानवीहक्क ांसाठी लढायला प्रवृत्त करणं, ही आजच्या काळातली सर्वात अवघड गोष्ट आहे. या समुदायाची पराभूत मानसिकता हताश करणारी असते. जातिव्यवस्थेचे बळी असणारे हे लोक तिचे कट्टर समर्थक असतात. सोशल नेटवकिर्ंग, एनजीओ कल्चर आणि माकेर्टिंगच्या आजच्या व्यापारीकाळात आपलं भवितव्य पणाला लावून व्यवहारी तरुण पिढीने या कामात झोकून देणं वेडेपणाचंच ठरावं. पण भिकेची भाकरी खायला चटावलेल्यांना कष्टाचं मोल पटवून देण्याचं आणि प्रतिष्ठा हवी असेल तर लाचारी व परावलंबित्व वाढविणारे परंपरागत व्यवसाय बदलून स्वकष्टावर आधारित स्वावलंबी जीवन जगण्याची ऊमीर् त्यांच्यात निर्माण करण्याचं आव्हान पल्लवीने स्वीकारलं आहे. आजच्या सर्व शासकीय योजना अपुऱ्या नि दिखाऊ आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा आणि निधीचा अभाव याच्यामुळे त्या फक्त कागदावरच राहतात. त्यांचा लाभ घेण्यासाठी रहिवासी व जातीचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. ते मिळविणं हे या मंडळींसाठी नोबेल किंवा ऑस्कर मिळविण्याइतकं अवघड असतं. त्यासाठीचे वास्तव्य आणि जातीचे १९६१ पूवीर्चे पुरावे त्यांनी आणायचे कोठून? बहुतांश शासकीय यंत्रणा कागदप्रेमी, माणूसघाण्या आणि संवेदनाहीन आहेत. तेव्हा पल्लवीने या मंडळींना हे दाखले मिळवून देण्याची व्यापक मोहीम हाती घेतली. ३० हजार लोकांना सदर दाखले मिळवून दिले. तिच्या या कामाची दखल 'युनायटेड नेशन्स मिलेनियम डेव्हलपमंेट गोल्स प्रोग्राम'ने (यूएनडीपी) प्रमाणपत्र देऊन घेतली. 

महिलांचे बचत गट, कायदेशीर सल्ला, आश्रमशाळांना जोडून जीवन शिक्षण कंेद, पारधी पुनर्वसन, अत्याचार निर्मूलन, कला-साहित्य-संस्कृतीचं दस्तावेजीकरण, जाणीव जागृती, कार्यकर्ता प्रशिक्षण, निसर्ग शेती, जातनिहाय आथिर्क-सामाजिक सवेर्क्षण, सामाजिक प्रबोधन, धोरणनिमिर्ती आणि सोशल नेटवकिर्ंगद्वारे तरुणांची फळी निर्माण करणं यावर तिचा भर आहे. 'लोकधारा' ही देशातील १८ राज्यांत कार्यरत असणारी आणि नॅशनल अॅडव्हायझरी कौन्सिल, नियोजन आयोग तसंच सामाजिक न्याय मंत्रालय यांना तज्ज्ञ सल्ला पुरविणारी संघटना आहे. आम्ही संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी संपर्क, नियोजन आणि कनेक्टिविटीसाठी संपूर्णतया पल्लवीवर अवलंबून असतो. लॅपटॉप आणि मोबाईल यात ती सतत व्यस्त असते. प्रत्येक संदर्भ तिच्या जिभेच्या टोकावर असतो. कंेदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी 'रेणके आयोग अहवाला'संदर्भात चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक आयोजित केली होती. त्यावेळी तिने अहवालातले अचूक संदर्भ देऊन केलेल्या प्रभावी मांडणीमुळे शरद पवार, छगन भुजबळ आणि सर्व उपस्थित मान्यवर भारावून गेले होते. नॅशनल अॅडव्हायझरी कौन्सिलचे सदस्य डॉ. नरंेद जाधव यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेतील पल्लवीच्या मांडणीची सर्व उपस्थितांनी खुलेपणाने प्रशंसा केली होती. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर कायद्याप्रमाणे भटक्या-विमुक्तांचे प्रतिनिधी घेण्यासाठी न्यायालयीन लढा देऊन तिने न्याय मिळवला. आयबीएन-लोकमत वाहिनीने तिची 'आम्ही दुर्गा' या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित केली होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा 'राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१०' पल्लवीला मिळाला आहे. 

ब्रिटिशकाळात भटके-विमुक्त समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला. तामदडीर् (ता. मंगळवेढा, जि. सोलपुर) येथील पारधी समाजातील रवीन्द काळे यांचं कुटुंब गेल्या चार पिढ्या पोलिस अत्याचाराचं बळी ठरलं आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पल्लवीने प्रबळ शासनसत्तेविरुद्ध दिलेला यशस्वी लढा हे या चळवळीतील सुवर्णपान आहे. 

सभा-संमेलनं, परिषदा, चर्चासत्रं यात आपल्या खेळकर, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी र्वक्तृत्वाने ती बाजी मारून जाते. भटके-विमुक्त महिला आणि युवती यांच्याशी तिचं खास गुळपिठ आहे. चळवळीतील सर्वच लहानथोरांची ती लाडकी लेक आहे. 'भटके-विमुक्त अधिकार जनजागरण यात्रे'त १० हजार कि.मी. प्रवास करून तिने लाखो लोकांशी हृद्य संवाद साधला. लोकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि तिच्या सामाजिक नेतृत्वावर व्यक्त केलेला विश्वास बघून आम्ही भारावून गेलो. 

शाळेत खोडकर म्हणून प्रसिद्ध असलेली ही मुलगी आज आधुनिक पेहराव आणि उच्च विचारसरणीमुळे आजच्या पिढीशी थेट संवाद साधत असते. तिचा स्वभाव तापट असला तरी वेळप्रसंगी आत्मपरीक्षण करून ती सहकाऱ्यांशी सहज जुळवून घेताना दिसते. फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी तिची पक्क ी नाळ जुळली आहे. आज ती गेलं दशकभर पूर्णवेळ आणि विना मानधन चळवळीसाठी झटत आहे. उदंड आत्मविश्वास, जबर आत्मभान आणि ध्येयासक्ती यांच्या जोरावर चालते आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्थापरिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद निर्मूलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे. रेणके आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ती प्रयत्नशील आहे. भारतीय सामाजिक भलेपणावर आणि राज्यघटनेतील मूल्यांवर माझा आणि माझ्या लेकीचा संपूर्ण विश्वास आहे. समाजाचं सामूहिक शहाणपण आणि समतावादी मूल्यांवरील विश्वास यांच्या जोरावर तमाम दुबळ्या समाजांचं आत्मभान जागविण्याच्या तिच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल!  

No comments:

Post a Comment