Palah Biswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity No2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Zia clarifies his timing of declaration of independence

what mujib said

Jyothi Basu Is Dead

Unflinching Left firm on nuke deal

Jyoti Basu's Address on the Lok Sabha Elections 2009

Basu expresses shock over poll debacle

Jyoti Basu: The Pragmatist

Dr.BR Ambedkar

Memories of Another day

Memories of Another day
While my Parents Pulin Babu and basanti Devi were living

"The Day India Burned"--A Documentary On Partition Part-1/9

Partition

Partition of India - refugees displaced by the partition

Tuesday, January 17, 2012

Fwd: [Buddhist Friends] दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण, हरी नरके आणि संभाजी...



---------- Forwarded message ----------
From: Akash Tayade <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2012/1/17
Subject: [Buddhist Friends] दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण, हरी नरके आणि संभाजी...
To: Buddhist Friends <buddhistfriends@groups.facebook.com>


दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण, हरी नरके आणि...
Akash Tayade 3:38pm Jan 17
दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण, हरी नरके आणि संभाजी ब्रिगेड, बामसेफ वाद
या विषयावरील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते विनीत वानखेडे यांचा लेख....

सध्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडला "लक्ष्य" बनवून धुळवड खेळणे चालू आहे. आणि या धुळवडीत चांगले चांगले विचारवंतही (!) आपले हात रंगवत आहेत. मूळ विषय सुरु झाला तो दादू कोंडदेव याचा पुतळा जिजापूर (पुणे) येथील लाल महालातून काढला म्हणून. हे इतिहासाचे शुद्धीकरण होते हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. पण काही विशिष्ट लोकांनी दादूचा पुतळा काढला म्हणून आरोळ्या मारणे सुरु केले आहे. नवीन हाती आलेल्या पुराव्यांवरून इतिहासाची पुनर्रचना आणि पुनर्मांडणी होणे गरजेचे असते. आणि तो इतिहास जतन करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली ती संभाजी ब्रिगेड व भारत मुक्ती मोर्चाच्या संघर्ष मेळाव्यापासून, हा मेळावा दादूचा पुतळा हटवण्यात यावा यासाठी घेण्यात आला होता. दादू कोंडदेव हा शिवरायांचा गुरु नसताना गुरु म्हणून बहुजनांच्या मनावर ठसवला गेला. आणि जेम्स लेन प्रकरणानंतर दादू गुरु म्हणून थोपवण्यामागे ब्राम्हणांची काय चाल होती ती समोर आली. जेम्स लेनने तसे विकृत लिखाण केल्यानंतर दादू कोण हा प्रश्न सगळ्यांना पडणे साहजिक आहे. त्यामुळे बहुजन इतिहासकारांनी ऐतिहासिक साधनांचा पुनराभ्यास करून दादू हा गुरु नव्हता याचे ठोस पुरावे शोधून काढले. त्यामुळे दादूची गच्छंती झाली. आणि ती होणे इतिहासाच्या तटस्थ मांडणीच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते.
सगळ्यात महत्वाची आरोळी हि मा.हरी नरके यांची होती. त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही असे मला वाटते. नरके साहेबांनी उपस्थित केलेले मुद्दे आमच्या दृष्टीने महत्वाचे नाहीत पण त्यांनी उपस्थित केलेत म्हणून त्याला उत्तर द्यावेसे वाटले. नरके साहेब म्हणतात कि ब्राम्हण आणि क्षत्रिय यांच्या युतीत नेहमी दलित-ओबीसींचा बळी गेलेला आहे. नरकेंसारख्या एका विद्वानाने असला पोरकट मुद्दा उपस्थित करावा याचे आश्चर्य वाटते. नरकेंना बहुधा माहित नसावे कि बहुतांश ओबीसी सुद्धा स्वतःला क्षत्रिय समजतात. ते समजतात यासाठी म्हटलो कारण ब्राम्हणी धर्मानुसार कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत. आणि छ.शिवाजी महाराज तसेच राजर्षी छ.शाहू महाराज यांना सुद्धा ब्राम्हणांनी शुद्र म्हटले होते. खुद्द महात्मा फुले शिवरायांवर लिहिलेल्या पोवाड्यात याचा उल्लेख केलेला आहे.
मग श्रीमान नरके कोणत्या आधारावर मराठयांना क्षत्रिय ठरवू इच्छितात? आणि मराठा सेवा संघाचीही कधी अशी भूमिका नाही कि मराठे क्षत्रिय आहेत. (वाचा: ब्राम्हणी धर्मानुसार मराठे शूद्रच! ले- प्रवीणदादा गायकवाड) कळीचा मुद्दा हा आहे कि मराठे विचार करू लागलेत. मराठयांनी डोळे झाकून ब्राम्हणांना साथ दिली कि ते चांगले, आणि स्वतःचे डोके वापरून काही केले तर ते जातीयवादी? संभाजी ब्रिगेडने ब्राम्हणांची हरामखोरी जगजाहीर केली म्हणून नरके यांच्या पोटात का दुखावे? दादू हा गुरु नाही हे खुद्द जोतिबांनी पोवाड्यातून सुचवले आहे, नरके त्यांना नाकारू इच्छितात का? समितीत घेतलेल्या लोकांचे जातीय विश्लेषण नरकेंना का करावेसे वाटले? जयसिंगराव पवारांचे, सदानंद मोरे सरांचे इतिहासाच्या क्षेत्रातील योगदान नाकारणार का?
छ.शिवराय हे काही कुठल्या संघटनेची किंवा समुदायाची खाजगी मालमत्ता नाही आहेत कि त्यांच्यावर कुणाच्या वर्चस्वाचा प्रश्न येईल. नरकेंनी यासाठी व्यथित होण्याचे कारण नाही. जेम्स लेन प्रकरणी फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात बंदी घालून प्रश्न सुटणार नव्हता कारण ते पुस्तक जगात इतरत्र मिळू शकले असते. म्हणून संभाजी ब्रिगेडची अशी मागणी होती आणि आहे कि केंद्र शासनाने यात हस्तक्षेप करून लेनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला भरावा. आणि सरकार सुद्धा भटांचे बटिक आहे. प्रशासनातील ब्राम्हणांनी मुद्दाम अध्यादेशात लूप होल्स ठेवले. जेणेकरून कोर्टात बंदी टिकू नये. आणि या पुस्तकाला मदत करणार्‍या भटांविषयी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी अतिशय मुद्देसूद लिखाण केलेले आहे. ते पुढील लिंक वरती उपलब्ध आहे.
१) विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १
२) विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २
पुरंदरेची बाजू घेण्याआधी नरकेंनी लक्षात घ्यावे कि पुरंदरेने सोलापूर येथे जनता बँकेच्या व्याख्यानमालेत लेनचे तोंड फाटेस्तोवर कौतुक केले होते. लेनचे आणखी कोणाचेही आभार मानलेले असू देत पण त्यामुळे त्याला शिवरायांच्या बदनामीचे लायसन्स देणार का? आणि ज्या लोकांचे आभार मानलेत त्यापैकी किती लोकांनी ते पुस्तक वाचले याची जरा चौकशी करावी. त्याव्यतिरिक्त मंजुळ नावाच्या भांडारकर मधील लायब्रेरीयनचे "भारत देशीचे विदेशी विद्वान" हे पुस्तक वाचावे ज्यात ते म्हणतात कि "लेन आमच्या घरातल्या व्यक्ती सारखाच होता."
आणि नरके ज्या गोष्टीमुळे चिडलेत, तो म्हणजे २४ ऑक्टोंबर च्या मेळाव्यातील ठराव, तर त्या ठरावात असे म्हटले होते कि "भांडारकर संस्थेने लेनला मदत केली म्हणून अश्या शिवद्रोही संस्थेत आपण काम करू नये, व नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा." मग यात काय चुकीचे आहे. नैतिकतेच्या आधारावर ठराव द्या अशी मागणी केली होती, बळजबरी केली नाही. आणि फक्त नरकेंनीच यावर प्रतिक्रिया का दिली, आ.ह.साळुंखे सरांचे पण यात नाव होते. मग नरके साहेबच का पेटून थेट ब्राम्हणी छावणीत सामील झाले? तुमचा जर ठरावाला विरोध होता तर तो नोंदवायचा होता, थेट ब्राम्हणांच्या कंपूत प्रवेश म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी प्रतारणा नाही का? तुम्ही तो पेपर वाचता, मागणी केली हे सुद्धा माहित आहे मग वेगळे सांगण्याची अपेक्षा का बाळगावी? ज्या संस्थेने शिवरायांची बदनामी केली त्या संस्थेचा राजीनामा द्या म्हणून कुणी सांगण्याची गरज का पडावी? तुम्ही आपणहून राजीनामा का दिला नाही?
कोल्हापूर आणि सातारा दरबारने पुणे मनपाला पत्र लिहून नंतर पुतळा हटवण्याची मागणी केली होती, हे तुम्हाला माहित नाही कि मुद्दाम सांगायचे नाही. जर भटांनी भल्याभल्या इतिहासकारांना अंधारात ठेवले, तर राजघराण्याला चुकीची माहिती पुरवणे काय अवघड आहे? आणि संभाजी ब्रिगेडने कधीही असे म्हटलेले नाही कि भांडारकरांनी हि माहिती पुरवली, पण जर भांडारकर संस्था हि प्राच्यविद्या संशोधन संस्था असेल तर तिथे शिवचरित्राचा अभ्यास होतो असे कसे म्हणता येईल? लेन शिवभारतावर अभ्यास करायला आला म्हणता पण भांडारकर ने प्रसिद्ध केलेल्या यादीत शिवभारताचे नाव नाही. आणि जेम्स हा धार्मिक अभ्यासक आहे या लिंक वर बघा. तो शिवचरित्राचा अभ्यासक नव्हता आणि नाही.
लेनला फाशीच झाली पाहिजे एवढी हरामखोरी त्याने केलेली आहे, पण मग म्हणून का त्या चौदा जणांना माफ करायचे? जे दोषी आहेत त्या सगळ्यांनाच शिक्षा झाली पाहिजे. आणि आधी शेण खाऊन मग मला माफ करा म्हणायचे? खेडेकरांच्या पत्नी आमदार होत्या कारण त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे कुठे काम करायचे ते, नुसत्या स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारून जमत नसते तर स्त्रीला स्वातंत्र्य द्यायला लागते. आणि बी.जे.पी. त्यांना तिकीट का देत होते? कारण त्यांनी तेवढी कामे तिथे केली असतील म्हणूनच न? ह्यावेळी त्यांना तिकीट न देता दुसर्‍याला दिले तर ती जागा बी.जे.पी.ने गमावली. ह्याला काय म्हणणार? खेडेकर साहेब शासकीय अभियंता होते तेंव्हा बांधकाम मंत्र्याशी संबंध येणार नाही तर काय कृषी मंत्र्याशी येईल? आणि एका गोष्टीचे नवल वाटते, कधी म.से.संघाचे नाव राष्ट्रवादीशी जोडले जाते तर कधी भाजपशी. यांना काहीही करून मराठा सेवा संघाला विरोध करायचा असतो.
मराठा सेवा संघाने प्रकाशित केलेले साहित्य वाचूनच आम्हाला कोण शत्रू आणि कोण मित्र याची ओळख झाली, नाही तर आमच्यासारखे हजारो तरुण जय शिवाजी म्हणत कधी दलितांवर अत्याचार करत होते तर कधी मुसलमानांवर. पण मराठा सेवा संघाने मराठयांना शहाणे केले. आणि इथेच तथाकथित विचारवंतांची पोटदुखी सुरु होते. मराठे फुकट वापरायला भेटले कि बरे आणि स्वतःचे डोके चालवून काही केले कि जातीयवादी! महात्मा फुलेंच्या साहित्यात काय लिहिले आहे ते आपण वाचले तर बरे होईल. मग भटोबाचा कर्दनकाळ जोतीबा हे पटेल.सत्यशोधक चळवळ म्हणजेच ब्राम्हणेतर चळवळ! जर तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नसेल तर तुम्हाला महात्मा फुले कळलेत का, याची शंका येते. सत्यशोधक चळवळच मुळी ब्राम्हणेतरांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी सुरु करण्यात आली होती.
मराठा सेवा संघ हा काही तुमच्या हातभाराने पुढे आलेला नाही तो आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर पुढे आलेला आहे. आपले बहुजन चळवळीतील योगदान आम्ही नाकारणार नाहीच कारण आम्ही कृतघ्न नाही आहोत, पण तुमच चुकलं तिथं चुकलंच म्हणणार! कुठल्या चळवळीवर कुणाचा कब्जा असत नाही तिथे महामानवांच्या विचारांचा कब्जा असतो. कुणाचा कब्जा असायला चळवळ म्हणजे तुम्हाला एखादे जनावर वाटले काय? ''जिभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा''हि मागणी कुणाची होती नी कुणाच्या नावावर खपवताय? अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा अशी मागणी कुणी केली? मराठा सेवा संघाने एकदाही अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा अशी मागणी केलेली नाही.
तुम्ही मराठा-दलित वाद भडकावण्याची सुपारी घेतल्यासारखे बोलू नका. रिडल्स वर बंदी घाला म्हणणार्‍याना कुणी भडकावले हे जरा सांगाल का? आणि रिडल्स ला विरोध करणारे सत्य माहित होताच रिडल्स डोक्यावर घेऊन गावोगाव फिरले हे कोण सांगणार? केवळ आणि केवळ मराठा सेवा संघामुळेच बाबासाहेब मराठयांना कळाले आणि त्यांनी ते स्वीकारले. शालिनीताई पाटील यांना मराठा विश्वभूषण पुरस्कार हा त्यांनी केलेल्या महाराणी ताराराणी यांच्यावरील संशोधना साठी दिला होता.
शालिनीताई पाटील यांनी बाबासाहेबांच्या विरुद्ध जी काही वक्तव्य केली होती त्याचा निषेध संभाजी ब्रिगेडने केलेला आहे. ब्राम्हणांनी ताईंचा वापर करून मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला होता पण संभाजी ब्रिगेड मुळे तो फसला. आज ताईंचे परिवर्तन झाले आहे. खैरलांजी प्रकरण हे बहुजन लोकांनी केले होते पण त्यांची वृत्ती मनुवादी होती संभाजी ब्रिगेडने खैरलांजी प्रकरणाचा निषेध करून मनुवादी वृत्तीला ठेचून काढण्यासाठी आंदोलन पण उघडले आणि ते आजपर्यंत चालू आहे. ब्राम्हणी विचारसरणी मध्ये राहिले कि खैरलांजी सारखे प्रकरणे होतात. सचिन गोडांबे हा संभाजी ब्रिगेडचा युवक यानेच खैरलांजी प्रकरण जागतिक पातळी वर पोहचवले. याला काय म्हणाल?
अजूनही आपल्याला काही आक्षेप असतील तर ते आपण संघटनेपुढे मांडावेत. चव्हाट्यावर वादाचे प्रदर्शन करू नये हि विनंती. आपण चर्चेला तयार असाल आणि जर खरेच बहुजन चळवळीची काळजी असेल तर मान-अपमान न बाळगता संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून चर्चा करावी. कुणी बोलावण्याची वाट पाहू नका .आणखी जाता जाता ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांचा एक अतिशय सुंदर लेख संदर्भासाठी देतो आणि त्यातले एक वाक्य उद्धृत करतो. "मराठयांचा फक्त भोग बघू नका, त्यांचा त्यागही बघा!" - at Nasik (Nashik), Maharashtra.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment